Daily Horoscope 22 November Rashi Bhavishya : कन्या राशीला ठरणार सुवर्ण दिवस; पाहा तुमचे भविष्य
मेष (Aries Horoscope Today) : दुग्धव्यवसायात आर्थिक लाभ. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. मनपसंत काम कराल. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे जोडीदार दुखावली जाण्याची शक्यता.
वृषभ (Taurus Horoscope Today) : परदेश व्यापारातून धन लाभ होऊ शकतो. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. कामांच्या ठिकाणी तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल.
मिथुन (Gemini Horoscope Today) : आर्थिक बचत कराल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. वेळेचे भान ठेवा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.
कर्क (Cancer Horoscope Today) : खर्चाचे प्रमाण वाढेल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल.
सिंह (Leo Horoscope Today) : धन हानी होऊ शकते. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. कोणी कान फुंकल्यामुळे जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण सर्व काही ठीक होईल.
कन्या (Virgo Horoscope Today) : धन लाभ होऊ शकतो. कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. आजूबाजूची माणसे काय करतात याकडे बारकाईने लक्ष ठेवा. स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे.
तूळ (Libra Horoscope Today) : शेअर बाजारात नुकसान संभवते. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करा. तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल.
धनु (Sagittarius Horoscope Today) : झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल.
मकर (Capricorn Horoscope Today) : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिक स्थिती बिघडेल. कंटाळवाण्या आणि व्यस्त अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील.
मीन (Pisces Horoscope Today) : उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.