लहान मुलांना लागली आहे वाईट नजर? घरीच करा 'हा' उपाय, काही मिनिटात होईल नाहीशी
Nazar Dosh Upay : जेव्हा मुले चिडचिड करतात, विनाकारण रडत राहतात, दूध किंवा खाणे-पिणे बंद करतात आणि आजारी पडतात, तेव्हा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर लागली आहे. काही लोक अशा गोष्टींना अंधश्रद्धेचे नाव देतात. पण शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी नाकारता येत नाहीत.
शास्त्रासोबतच ज्योतिष शास्त्रातही नजर लागणे आणि काढणे असे सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रात, नजर लागणे नकारात्मक उर्जेशी संबंधित आहे. यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांवरच नाही तर कोणतीही व्यक्ती, नोकरी-व्यवसाय आणि घरावरही परिणाम करू शकते. तुम्हाला माहिती आहे का की वाईट नजर कशी लागते आणि कशी दूर करावी. जाणून घ्या...
वाईट नजर कशी लागते?
नवजात किंवा लहान मूलांना अनेकदा नजर लागते. खरं तर लहान-निरागस मुलं आकर्षक आणि गोंडस असतात आणि ती सगळ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. कुटुंबातील सदस्यांसोबत इतर लोकही मुलांशी जोडले जातात. लोकांना कधीही मुलांचे नुकसान करायचे नसते. परंतु, काही लोकांची दृष्टी जड असते, त्यामुळे मुलांना नजर लागते आणि त्यामुळे मुले आजारी पडतात. कधीकधी मुलांच्या डोळ्यांचा रंगही बदललेला दिसून येतो. पण, घरगुती उपायांनी तुम्ही मुलाची वाईट नजर दूर करू शकता.
या उपायांनी दूर करा वाईट नजर
पाणी आणि फुले : मुले खूप रडतात आणि चिडचिड करतात. तुमच्या मुलांनीही असे केल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले ठेवा आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा गोल फिरवून काढा. यानंतर पाणी एका कुंडीत टाका. यामुळे वाईट नजरचा प्रभाव कमी होतो.
दूध : वाईट नजरेमुळे जेव्हा मूल दूध पिणे बंद करते, तेव्हा शनिवारी तुम्ही थोडे कच्चे दूध बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा गोल फिरवावे आणि नंतर हे दूध काळ्या कुत्र्याला प्यायला द्यावे.
मोहरी, मीठ आणि मिरचीचा उपाय : हा उपाय सोपा असण्यासोबतच खूप लोकप्रिय आहे. यासाठी हातात थोडे मीठ, मोहरी, लसूण, कांद्याची साले आणि सुक्या लाल मिरच्या घेऊन मूठ घट्ट करा आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवा आणि नंतर सर्वकाही आगीत जाळून टाका.
मीठ : मिठापासून नजर काढण्याचा हा उपाय खूप सोपा आहे. आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करताना आपल्या मुठीत थोडे मीठ घेऊन मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवा आणि पाण्यात सोडून द्या. पण लक्षात ठेवा, मीठ अशा पाण्यात टाका, ज्याचा रस्ता घराच्या बाहेरील बाजूस जातो.
दुधातील साखरेचा उपाय : लहान मुलांना वाईट नजर लागल्यावर दुधात थोडी साखर मिसळून मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत ७ वेळा फिरवून काढून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. हे देखील वाईट नजरचा प्रभाव दूर करते.