पितृ पक्षात नवमी तिथीचं काय आहे महत्व? कोणाचे श्राध्द करावे? जाणून घ्या

पितृ पक्षात नवमी तिथीचं काय आहे महत्व? कोणाचे श्राध्द करावे? जाणून घ्या

पितृपक्ष हा पितरांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते. या काळात 15 दिवस श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केले जाते.

Pitru Paksha Navmi : पितृपक्ष हा पितरांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते. या काळात 15 दिवस श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केले जाते. पितृ पक्षाच्या नवमीच्या दिवसाला आयोनवमी किंवा आई नवमी किंवा मातृ नवमी असेही म्हंटले जाते. या दिवशी माता, सुना आणि मुलींसाठी पिंड दान केले जाते. मातृ नवमी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते. पितृ पक्षातील सर्व दिवस महत्त्वाचे मानले जातात, परंतु नवमी तिथीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे.

आयो नवनीचा शुभ मुहूर्त कधी आहे?

पौराणिक मान्यतेनुसार मातृ नवमीला पितरांचे श्राद्ध केल्यास सुख-समृद्धी वाढते. या वर्षी आश्विन महिन्याची नववी तिथी 7 ऑक्टोबर रोजी आहे. याचा मुहूर्त दुपारी 1:19 ते 3:40 पर्यंत असेल.

आयो नवमीच्या दिवशी काय करावे?

- सकाळी लवकर आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालावेत.

- घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कापडावर मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो लावून हार घालावा.

- या फोटोंसमोर काळ्या तिळाचा दिवा लावा.

- मृत कुटुंबातील सदस्यांना गंगाजल आणि तुळशीची पाने अर्पण करा.

- श्राद्धविधी केल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी जेवणाचे ताट ठेवावे.

- गाय, कावळा, मुंगी, पक्षी आणि ब्राह्मण यांना भोजन अर्पण करावे. तरच श्राद्ध पूर्ण मानले जाईल.

आयो नवनीचे महत्व

असे मानले जाते की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते. याशिवाय या दिवशी मृत मातांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो. घरातील स्त्रिया, बहिणी, सुना, मुली यांना त्यांच्या दिवंगत मातांचे आशीर्वाद मिळतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com