(Brasília - DF, 13/11/2019) Presidente da República Popular da China, Xi Pinping.
Foto: Alan Santos/PR
International
‘चीनवर दादागिरी कराल तर डोकं ठेचू’
चीनविरोधात दादागिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी शक्तींचं डोकं ठेचू अशा शब्दांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अन्य राष्ट्रांना इशारा दिला आहे. चीनच्या जनतेनं नवं विश्व उभं केलं आहे असं सांगत त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दीनिमित्त देशाला संबोधित केलं.
तिआनमेन चौकात तासभर केलेल्या भाषणामध्ये लष्कर प्रबळ करणं, तैवानला चीनमध्ये एकजीव करणं आणि हाँगकाँगमध्ये सामाजिक स्थैर्य आणणं हे अग्रक्रम असल्याचं जिनपिंग यांनी सांगितलं.