Indian Cricketers Retired In 2024: 2024 मध्ये निवृत्ती घेतलेले भारतातील टॉप क्रिकेटर्स कोणते?

Indian Cricketers Retired In 2024: 2024 मध्ये निवृत्ती घेतलेले भारतातील टॉप क्रिकेटर्स कोणते?

2024 मध्ये निवृत्ती घेतलेल्या भारतातील टॉप क्रिकेटर्सची यादी पाहा. भारतीय क्रिकेटमधील मोठे बदल आणि नवीन चेहऱ्यांची माहिती मिळवा.
Published on

2024 हे वर्ष पुर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 2024 हे वर्ष एक अविश्वसनीय वर्ष ठरले आहे, अनेक काही अविश्वसनीय गोष्टी या वर्षात घडून गेल्या आहेत. 2024 मध्ये भारतीय क्रिकेटर्समध्ये अनेक बदल होताना पाहायला मिळाले. अनेक मोठ्या खेळाडूंनी या वर्षात आपल्या करिअची चांगली सुरवात केली तर अनेक खेळाडूंनी या वर्षात निवृत्तीची घोषणा केली आहे. 2024 हे असे वर्ष आहे ज्यात अनेक अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या कारकिर्दीत वेळ काढला आहे.

रविचंद्रन अश्विन

नुकतीच भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 18 डिसेंबर 2024ला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रवास थांबवला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना भारताने अनिर्णित ठेवल्यानंतर अश्विनने धक्कादायक निर्णय घेतला. आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 38 वर्षीय अश्विन टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण 537 कसोटी विकेट्स आहेत.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा

भारताचे तीन दिग्गज खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी एकाच दिवशी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर खेळाच्या T20I फॉरमॅटमधून या तिघांनी निवृत्ती घेतली. विराट कोहलीच्या नावे अनेक विक्रम आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद 5000 धावा आणि सर्वात जलद 10 शतके या विक्रमांचा समावेश आहे.

हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा 159 सामन्यांमध्ये 4231 धावा करणारा सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके ठोकले आहेत. रवींद्र जडेजा डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजी करतो. जडेजाने 2009 मध्ये पदार्पण केल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये 2,000 धावा करणारा आणि 200 बळी घेणारा पाचवा भारतीय आणि पाचवा सर्वात जलद खेळाडू बनला आहे.

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकने 1 जून 2024ला आयपीएलसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या दिनेश कार्तिकने त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.

शिखर धवन

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने 24 ऑगस्ट 2024ला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटमधील गब्बर म्हणून याला ओळख मिळाली. त्याने भारतीय संघाकडून 167 एकदिवसीय कसोटी सामने खेळून त्यात 6782 धावा, 68 टी20 खेळत 2315 धावा तसेच 34 कसोटी सामने खेळून 1759 धावा केल्याआहेत. शिखर धवनने बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताकडून 2022 मध्ये शेवटचा सामना खेळला.

धवल कुलकर्णी

धवल कुलकर्णी उजव्या हाताचा मध्यम-वेगवान गोलंदाज असून त्याने 5 सप्टेंबर 2024 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याला चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. धवल कुलकर्णी याने रणजी ट्रॉफी फायनल आपला अखेरचा सामना असल्याचं जाहीर केलं होतं. धवलने या महाअंतिम सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com