मुंबईतील मिलिंद नगर, पवई-व्हेंचुरी येथील 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीवरील ३०० मिलीमीटर व्यासाच्या पर्यायी bypass शुक्रवारी अचानक मोठी गळती आढळून आली आहे. त्यामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला आहे. जलवाहिनी दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून त्यास १५ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे एन व एल विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा आज शुक्रवार, सायंकाळी ०५ वाजेपासून शनिवार सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.