Health
HealthTeam Lokshahi

‘किडनी स्टोनच्या’ त्रासावर हे करा घरगुती उपाय...

दररोज दोन ते साडेतीन लीटर पाणी प्यावे
Published by :
Saurabh Gondhali

उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढू नये, यासाठी काय करावे, जाणून घ्या...

१. शरीरातील पाणी पातळी संतुलित राखण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. यामुळे किडनी स्टोनचा त्रास वाढण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यासाठी दररोज दोन ते साडेतीन लीटर पाणी प्यावे, असे सांगितले जाते.

Health
वेळेवर झोप लागत नाही ? जाणून घ्या उपाय

२. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रक्रिया केलेले पॅकींगचे अन्नपदार्थ तसेच जास्त मीठ असणारे खारवलेले पदार्थ खाणे टाळावे. तसेच विकत मिळणारे कोल्ड्रिंक्सही उन्हाळ्यात घेणे टाळावे. हे ड्रिंक्स खूप जास्त ॲसिडीक असतात. शरीरातील ॲसिडिक घटक वाढले की मुतखड्याचा त्रास वाढू शकतो. 

३. उन्हाळ्याचे २ महिने कॅल्शियमचा वापरही मर्यादित असावा. पण यामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होणार नाही, याची काळजी घ्या. नाहीतर कॅल्शियमची कमतरता इतर काही आजारांचा धोका वाढवते.

Health
‘ब्लड प्रेशर’ कमी ठेवण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा

४. उन्हाळ्यात हाय प्रोटीन डाएट घेणे तसेच खूप जास्त गोड पदार्थ खाणे, यामुळेही किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो.

५. इतर काही आजारांमुळे ॲण्टीबायोटिक्सचा हेवी डोस सुरू असेल तरीही त्या गोळ्यांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे या बाबतीत डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधींमध्ये आवश्यक तो बदल करून घ्यावा. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com