Health
HealthWinter Health Tips

Health Tips: हिवाळ्यात कारले खाण्याचे अत्यंत गुणकारी फायदे

Winter Health Tips : कारलं सर्दी आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देण्यास मदत करते.
Published by :
Team Lokshahi

हिवाळा सुरु झाला की अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. सर्दी आणि घसादुखी यांसारख्या अनेक आजारांचा प्रत्येकाला सामना करावा लागतो. म्हणूनच हिवाळ्यात विशेषत: खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते.

कारल्याचा रस हिवाळ्यात खूप फायदेशीर मानला जातो. सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. कारल्याचा रस प्यायल्याने आपले रक्त शुध्द होते. यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही कमी होण्यास मदत होते. तसेच तुमचा चेहराही तजेलदार राहण्यास मदत होते.

Health
हिवाळ्यात करा मुळ्याचे सेवन होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

नेहमी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, कारल्याची पाने बारीक करून कपाळावर लावा. असे केल्याने डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com