विमान उड्डाण करताना टेकऑफचा अनुभव, हवेत होणारे झटके (टर्ब्युलन्स) आणि बंद जागेचं दडपण या सर्व गोष्टी मनावर ताण आणतात. त्यामुळे काही लोकांना भीती वाटते आणि ते अस्वस्थ होतात. पण अशी एंजायटी दूर करण्यासाठी औषधं घेणं हाच एकमेव पर्याय नाही. काही सोपे आणि नैसर्गिक उपाय आहेत जे तुमच्या मनाला शांत ठेवू शकतात.
सर्वात प्रभावी उपाय दीर्घ श्वास म्हणजे डीप ब्रीदिंग, म्हणजेच सखोल श्वसन. यामध्ये तुम्ही 4 सेकंद श्वास घ्या, 7 सेकंद थांबा आणि 8 सेकंद श्वास सोडा. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते आणि मन शांत राहतं.
दुसरा उपाय म्हणजे संगीत ऐकणं. सौम्य, शांत किंवा निसर्गध्वनीसारखं संगीत तुम्हाला रिलॅक्स करतं. रेन साऊंड, समुद्राच्या लाटा किंवा सौम्य वाद्यसंगीत तुमचं लक्ष एंग्जायटीपासून दूर नेतं.
तिसरा नैसर्गिक उपाय म्हणजे हर्बल टी आणि लॅवेंडर ऑईल. बोर्डिंगपूर्वी कॅमोमाईल किंवा पेपरमिंट टी प्यायल्यास शरीराला विश्रांती मिळते. तसेच रुमालावर लावलेले काही थेंब लॅवेंडर ऑईल सूंघल्याने तणाव लक्षणीयरीत्या कमी होतो.
जर तुमचं मन घाबरण्याकडे अधिक झुकत असेल, तर पुस्तक वाचन किंवा पॉडकास्ट ऐकणं हा उत्तम पर्याय ठरतो. यामुळे मनाचं लक्ष इतरत्र जातं आणि एंग्जायटी कमी होते
शेवटी, जर तुम्हाला बंद जागेची भीती वाटत असेल, तर खिडकीजवळची सीट बुक करा. बाहेरचं दृश्य पाहून मन अधिक शांत राहतं. झटके कमी जाणवण्यासाठी विमानाच्या पुढच्या भागातली सीट निवडणं देखील फायदेशीर ठरू शकतं.