उरलेल्या चहा पावडरच्या मदतीने दूर करा डार्क सर्कल, जाणून घ्या फायदे आणि कसे वापरावे

उरलेल्या चहा पावडरच्या मदतीने दूर करा डार्क सर्कल, जाणून घ्या फायदे आणि कसे वापरावे

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणं सामान्य गोष्ट आहे. या समस्येला अनेक कारणे जबाबदार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणं सामान्य गोष्ट आहे. या समस्येला अनेक कारणे जबाबदार आहेत. उशिरा झोपणे किंवा जास्त झोपणे, संगणकासमोर जास्त वेळ काम करणे, मानसिक आणि शारीरिक ताण, जास्त थकवा, झोप न लागणे यामुळे तुमची त्वचा निस्तेज होते ज्यामुळे डोळ्यांवर काळी वर्तुळे दिसतात. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळेही काळी वर्तुळे होतात. अनेक वेळा डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या अनुवांशिक किंवा वृद्धत्वामुळे देखील होते. हार्मोन्समधील बदल, अतिनील किरणांच्या संपर्कात येणे आणि धुम्रपान यामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतात.

उरलेली चहाची पावडर काळी वर्तुळे दूर करण्यात खूप मदत करतात. चहाची पावडर वापरल्यानंतर फेकून देत असाल तर आजपासून जतन करा. चहाची पावडरचा वापर चेहऱ्यावर केल्यास ते त्वचेला एक्सफोलिएट करते आणि त्वचेवर चमक आणते. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उरलेली चहाची पावडर कशी वापरायची ते जाणून घेऊया.

चहाची पावडर शरीरासाठी नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात. त्वचेवर अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफिनचा वापर त्वचा निरोगी आणि तरुण बनवण्यासाठी प्रभावी सिद्ध होतो. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी चहाची पावडरचा वापर खूप प्रभावी ठरतो. डोळ्यांची काळी वर्तुळे घालवण्यासाठी चहाची पाने अंडर आय क्रीममध्ये मिसळून डोळ्यांखाली रात्रभर राहू द्या, काळी वर्तुळे दूर होतील.

चहाची पावडरमध्ये असलेले अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात आणि चेहऱ्यावर चमक आणतात. चहाच्या पावडरचा स्क्रब लावल्याने काळी वर्तुळे पूर्णपणे गायब होतात. चहाच्या पानांचे स्क्रब चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते. चेहऱ्यावर वापरल्याने अतिरिक्त तेल कमी होते आणि मुरुमांपासून मुक्ती मिळते.

येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की लोकशाही मराठी न्यूज कोणत्याही प्रकारच्या माहितीची पुष्टी करत नाही. संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com