Health Benefits of Coriander
Health Benefits of CorianderTeam Lokshahi

पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात करा कोथींबीरचा समावेश

कोथिंबीर ही आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. कारण त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट असे अनेक पोषक घटक अढळतात.

कोथिंबीर (Health Benefits of Coriander) ही आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. कारण त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट असे अनेक पोषक घटक अढळतात. तसेच कॅल्शियम, पोटोशियम आणि व्हिटॅमीन असतात. जर तुम्हाला पोटासंबंधीत समस्या जाणवत असतील तर तुम्ही कोथींबीरचे सेवन करू शकता. ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तसेच तुमची पचनक्रिया सुधारते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात कोथींबीरचा समावेश करा. तर आज आपण या लेखातून कोथींबीरचे फायदे जाणून घेणार आहोत.

कोथींबीरचे सेवन करण्याचे फायदे :

  • कोथिंबीर पोटाच्या समस्यासाठी खूप उपयुक्त असते. त्यामुळे पाचनक्रिया सुधारते. जर तुम्हाला अपचन, मळमळ अशा समस्या जाणवत असतील तर तुम्ही ताज्या कोथिंबीरच्या पानांना ताकासोबत सेवन करणे खूपच फायदेशीर होईल.

  • कोथिंबीरमध्ये औषधी गुणधर्म खूप प्रमाणात असतात. कोथिंबीरमध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो. ते आपल्या शरीराच्या त्वचेसाठी खूप उपयुक्त असते. त्वचा कोरडी, पिंपल्स, टॅनिंग, यासाठी कोथिंबीर खाणे खूप उपयुक्त ठरते.

Health Benefits of Coriander
मलबेरी फळाचा करा आहारात समावेश होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
  • तोंडाच्या जखम लवकर बऱ्या करण्यासाठी कोथींबीर खूप उपयुक्त असते. कारण त्यामध्ये एंटी-सेप्ट‍िक गुणधर्म आढळतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात कोथींबीरचा समावेश करणे गरजेचे आहे.

  • प्रत्येकाच्या घरी कोथिंबीर आणि पुदीना चटणी बनवली जाते. पण त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि आपल्याला चांगली झोप येते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com