Health Benefits of Garlic
Health Benefits of Garlic Team Lokshahi

Health Benefits of Garlic : लसणीचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे

भारतीय अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
Published by :
shamal ghanekar

भारतीय अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण कमी का होईना पण आरोग्यासाठी दररोज लसूण खाणे उत्तम असते. पण कच्चा लसूण अधिक तिखट आणि उग्र वासाचा असतो. त्यामुळे फोडणीत किंवा एखाद्या पदार्थात टाकून जरी लसणाचे सेवन केले तरी चालू शकते. लसणीचा वापर जर अन्न पदार्थांमध्ये केला तर अन्न पदार्थांची चव वाढतेच आणि त्यामुळे आरोग्यालाही त्याचे अनेक फायदे (Benefits of Garlic) होतात. लसणाची चव कडवट असते मात्र सकाळी रिकाम्या पोटी लसूण (Garlic On Empty Stomach) चावून खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो. लसूण कच्चा किंवा भाजून (Benefits of Roasted Garlic) व्यवस्थित चावून खाल्ल्यास त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. तर चला जाणून घेऊया लसूण खाल्ल्याने काय आहेत फायदे.

Health Benefits of Garlic
Copper Water : तांब्याच्या भांड्यातले पाणी पिल्याने आरोग्याला होतात 'हे' फायदे

लसूण खाण्याचे फायदे :

  • लसणाकडे नॅचरल ॲण्टीबायोटीक म्हणूनही पाहिले जाते. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या चावून खाल्लाने शरीराला होणारे कोणतेही इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे सकाळी रिकामी पोटी लसूण घाणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.

  • लसूण नियमितपणे जर खाल्ले तर रक्ताच्यामधील गाठी होण्याची क्रिया मंदावते ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. अशा व्यक्तींनी दररोज लसूणाच्या पाकळ्या खाव्यात असे आहारतज्ज्ञही सल्ला देतात.

  • सर्दी, खोकला, दमा यासारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही लसूणचे सेवन करू शकता हे तुमच्यासाठी उत्तम असेल. सर्दी किंवा खोकला असल्यास कच्चा लसूण आणि गुळ यांचे चाटण करून खल्याने ते तुम्हाला फायदेशीर ठरते. तसेच टीबी झालेल्या रूग्णासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • लसूण खाल्याने आयोडीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक देखील मुबलब प्रमाणात मिळतात. त्यामुळे कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहते. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  • लसूण नियमितपणे सेवन केल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते. ज्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे लसूणचे सेवन नियमितपणे करणे गरजेचे आहे.

Health Benefits of Garlic
Spiny Gourd Benefits : कंटोला आहे आरोग्यासाठी फायदेशीर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com