Tanning Home Remedies : घरच्या घरी त्वचेचा काळपटपणा कसा दूर कराल ?
उन्हाळा सुरु झाला की अनेकांना त्वचेची काळजी कशी घ्यावी असा मोठा प्रश्न पडतो. उन्हाळ्यामध्ये आरोग्याबरोबरच त्वचेच्यादेखील अनेक समस्या उद्भवतात. त्यातील एक समस्या म्हणजे टॅनिंग. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सूर्याच्या किरणांमुळे त्वचा मोठ्या प्रमाणात काळी पडते आणि हेच टॅनिंग दूर करण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. पण हे टॅनिंग घरच्या घरी कसे दूर करता येईल? याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
बाजारामध्ये अनेक क्रिम्स आहेत ज्यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते असा दावा केला जातो. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही क्रीम जर त्वचेवर लावले तर त्याचे काही वेळेस गंभीर परिणामदेखील भोगावे लागतात. पण घरातील काही आशा गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे टॅनिंग दूर होण्यास मदत होऊ शकते.
मुलतानी माती आणि गुलाबपाणी : मुलतानी माती त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि गुलाबपाणी त्वचेला आराम देण्यास मदत करते. मुलतानी माती आणि गुलाबजल यांची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक धुवा. ही पद्धत त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
लिंबू आणि मध : लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला उजळ करण्यास मदत करतात. मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि ती मऊ करते. लिंबाचा रस आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी धुवा. या उपायामुळे टॅनिंग हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
काकडी आणि टोमॅटोचे पॅक : काकडी आणि टोमॅटो दोन्ही त्वचेला थंड करण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. काकडी आणि टोमॅटोचा रस काढून तो प्रभावित भागांवर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि टॅनिंग कमी होते.
दही आणि हळदीचा पॅक : दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा रंग सुधारतात. दही आणि हळदीची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा. नियमित वापरामुळे तुम्हाला टॅनिंगपासून आराम मिळू शकतो.