Health Tips
Health Tips Team Lokshahi

रोजच्या जेवणात या डाळींचा करा समावेश; वजनही राहिल नियंत्रणात

आपल्या रोजच्या जेवणात अनेक डाळींचा जास्त वापर होत नाही पण तुम्हाला माहित आहे का? या सर्व डाळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Published by :
shamal ghanekar

आपल्या रोजच्या जेवणात अनेक डाळींचा जास्त वापर होत नाही पण तुम्हाला माहित आहे का? या सर्व डाळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या डाळींमध्ये असणारे पौष्टिक गुणधर्म आपल्यासाठी गुणकारी असून आपले शरीर मजबूत ठवते. योग्य प्रमाणात या डाळींचे सेवन केल्याने तुम्हाला त्याचा फायदाच होईल.

मूगडाळ ही अगदी हलकी, आणि आजारात उत्तम असा आहार आहे. मूगडाळीमध्ये आढळणारे तंतुमय पदार्थ हे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी खूप महत्त्वाचे काम करते. मूगडाळीमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये मूगडाळीचा समावेश करा. मूगडाळ ही प्रतिकारशक्तीसाठीही चांगली असते.

Health Tips
दररोज एक चमचा तूप खा, जाणून घ्या त्याचे फायदे

हरभरा डाळीमध्ये अनेक घटक असतात जे शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील नाजूक अवयवांचे रक्षण करण्यासाठी मदत करते. या डाळीचे सेवन केल्याने आपले अवयव मजबूत ठेवते. हरभरा डाळीमध्ये पोटॅशियम खूप प्रमाणात असते. जे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.

उडीद डाळ ही पचायला जड असली तरी ती खूप पौष्टिक असते. मऊ केसांसाठी उडीद डाळीचा आहारात समावेश करा त्याचा तुम्हाला फायदा होईल. उडीद डाळीमध्ये पोटॅशियम ‘सी’ आणि ‘बी’ जीवनसत्त्वे, कॅल्शियम असे सर्व पौष्टिक घटक आहे.

तूरडाळमध्ये लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कोलिन हे घटक असतात. जे आपल्यासाठी पोषक मानण्यात येते. तूरडाळीचे अति प्रमाणात सेवन केल्यास आपल्याला पित्ताच्या समस्या जाणवू शकतात.

पचनविषयक समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात मसूर डाळीचा समावेश करा. मसूर डाळ सतत खाण्याची होणारी इच्छा कमी होते. जर तुमचे वाढते वजन कमी कारण्यासाठी तुम्ही या डाळीचे सारकिंवा पाणी प्यावे. ज्याचा तुम्हाला फायदाच होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com