Skin Care
Skin Care Team Lokshahi

हिवाळ्यामध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा समावेश

आपली स्किन हेल्दी (skin healthy) ठेवण्यासाठी रोज काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमची स्किन चमकदार आणि चांगली राहते.
Published by :
Team Lokshahi
Published on

आपली स्किन हेल्दी (skin healthy) ठेवण्यासाठी रोज काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमची स्किन चमकदार आणि चांगली राहते. विशेषतः हिवाळ्यामध्ये स्किन खूप कोरडी होऊ लागते आणि स्किनवर उपचार न केल्यास स्किन ड्राय होऊ लागते. अशावेळी तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही कारण आम्ही या लेखातून तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत त्यांचा तुम्हाला फायदाच होईल. तर चला जाणून घेऊया.

Skin Care
तुळशीचे 'हे' आहेत लाभकारी फायदे
  • हिवाळ्यामध्ये त्वचेला जास्त हायड्रेशनची गरज असते त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर वापरणे अधिक फायदेशीर आहे .

  • तुमची त्वचा हिवाळ्यात कोरडी होते. त्यामुळे शक्यतो गरम पाणी टाळणे आपल्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ करा. ते तुमच्या फायद्याचे राहिल.

  • हिवाळ्या ऋतूमध्ये सीरम वापरणे गरजेचे असते. कारण ते तुमच्या त्वचेला हायड्रेशनसाठी मदत करते. मुरुम सारख्या समस्यांपासून त्वचेचे रक्षण करते.

  • हिवाळ्यामध्ये पौष्टिक आणि हंगामी पोषण आहार आपल्या त्वचेला मिळणे गरजेचे असते.

  • हिवाळ्यात आवळ्यापासून तयार केले जाणारे ज्यूस प्या. त्यातील पोषक तत्वांमुळे आपली त्वचा निरोगी राहते. हिवाळ्यात आवळ्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर होऊ शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com