HIV | monkeypox
HIV | monkeypox team lokshahi

पुरुषाशी ठेवले संबंध आणि घडलं भलतंच, तरुणाला...

जगात पहिल्यांदाच असं घडल्याचं समोर आलं आहे
Published by :
Shubham Tate

monkeypox : इटलीमध्ये एका व्यक्तीला कोरोना संसर्ग, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही एड्स हे तिन्ही आजार झाले आहेत. त्याने दुसर्‍या पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवले, त्यानंतर त्याला हे आजार झाले आहेत. हे तिन्ही धोकादायक संसर्ग एका व्यक्तीला एकत्र होण्याची जगातील ही पहिलीच घडना आहे. 36 वर्षीय तरुणाला अशक्तपणा, ताप आणि घसा दुखत होता. मात्र, त्या व्यक्तीची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. (infected with corona monkeypox and hiv aids at same time after having sex with male)

HIV | monkeypox
Pure EV ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, एका चार्जवर 140KM धावणार

त्याआधी तो 9 दिवसांसाठी स्पेनला गेला होता आणि 16 जून ते 20 जून 2022 पर्यंत स्पेनमध्ये होता. त्याने सांगितले की, स्पेन दौऱ्यादरम्यान त्याने कोणत्याही संरक्षणाशिवाय दुसऱ्या पुरुषासोबत सेक्स केले होते. 2 जुलै रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्या दिवसापासून त्याच्या डाव्या हातावर पुरळ उठू लागली. यानंतर त्यांच्या शरीरावर जखमा सुरू झाल्या. 'जर्नल ऑफ इन्फेक्शन'मध्ये या प्रकरणाचा अहवालही प्रसिद्ध झाला आहे. तरुणाच्या अंगावर अगदी चेहऱ्यावर सर्वत्र जखमा आणि पुरळ दिसू लागले. त्यालाही खूप वेदना होत होत्या.

HIV | monkeypox
'माणूस जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत संपत नाही...', नाराज गडकरींचे विधान

5 जुलै रोजी, समस्या वाढल्यानंतर, तो माणूस उपचारासाठी कॅटानियातील सॅन मार्को विद्यापीठ रुग्णालयात पोहोचला. तेथून त्याला संसर्गजन्य रोग विभागात पाठवण्यात आले. तेथे त्यांची मंकीपॉक्सची तपासणी करण्यात आली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर अनेक एसआयटीच्या चाचण्या करण्यात आल्या आणि तोही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हा संसर्ग जुना नसून ताजा असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. मात्र, कोरोना आणि मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतर त्यांना 11 जुलै रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याच्या अंगावर फक्त जखमा उरल्या आहेत. यानंतर, डॉक्टरांनी सांगितले आहे की कोरोना आणि मंकीपॉक्सचा संसर्ग एकत्र होऊ शकतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, इतर काही संशोधनानंतरच हे समजेल की तिन्ही आजार एकत्र असल्याने रुग्णाची स्थिती किती बिघडते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com