आले फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

आले फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

चहामध्ये आले घातल्याने त्याची चव अनेक पटींनी वाढते.
Published by :
Siddhi Naringrekar

चहामध्ये आले घातल्याने त्याची चव अनेक पटींनी वाढते. चव वाढवण्यासाठी भाज्यांमध्येही आल्याचा वापर केला जातो. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आल्याचा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो. अनेकदा आले जास्त वेळ ठेवल्यास त्यातील रस सुकतो. अशा परिस्थितीत आले फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

जर तुम्हाला आले एक किंवा दोन आठवड्यांच्या आत वापरायचे असेल तर तुम्ही ते खोलीच्या तापमानावरही सुरक्षित ठेवू शकता. लक्षात ठेवा, आले ओलसर ठिकाणी ठेवू नका. असे केल्याने बुरशी येऊ शकते. थेट सूर्यप्रकाशाऐवजी कोरड्या आणि थंड ठिकाणी साठवा.

जर तुमच्याकडे फ्रीजमध्ये आले जास्त प्रमाणात असेल आणि तुम्हाला ते जास्त काळ वापरायचे असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. लक्षात ठेवा की जर आले असेच फ्रिजमध्ये ठेवले तर ते कोरडे होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत, हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास ते अधिक चांगले होईल, जेणेकरून ते अधिक काळ टिकेल आणि सुरक्षित राहील.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com