Workation : काम आणि सुट्टीचा एकत्रित अनुभव
तुम्ही घरून किंवा तुमच्या नेहमीच्या ऑफिस मध्ये काम करून कंटाळला आहात का आणि हे चित्र बदलण्याचा विचार करत आहात का? तर वर्केशन ही संकल्पना तुम्हाला नक्कीच आवडेल. वर्केशन (workation) म्हणजे "काम" आणि "सुट्टी" या दोन शब्दांचे मिश्रण. याचा अर्थ आहे, तुम्ही तुमच्या कामासोबत सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही ऑफिसमध्ये काम न करता, एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन ते काम करू शकता आणि सोबतच सुट्टीचा आनंद घेऊ शकता वर्केशनमध्ये, काम आणि सुट्टी यांचा अनुभव एकत्रितरित्या घेता येतो. तुम्ही लॅपटॉप घेऊन एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी प्रवास करू शकता आणि तिथे काम करू शकता.ही एक नवीन संकल्पना आहे जी व्यवसायात आरामासह काम ही करण्यास उपयुक्त असं आहे वर्केशन आता एक लोकप्रिय जीवनशैली बनत चालली आहे. अनेक लोक आता कामासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतात ही एक ट्रेंडिंग लाइफस्टाइल म्हणुन नावारूपास आली आहे.
वर्केशन'चे फायदे
1. नवीन ठिकाणी काम करणे आणि सुट्टीचा आनंद घेणे यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
2. नवीन वातावरणात काम केल्याने, लोकांना अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढते,
3. काहीजण कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्रवास करत असताना, त्यांच्या कामाचा वापर करतात, तर काहीजण नवीन संस्कृती आणि जीवनशैली अनुभवण्यासाठी कामाला वापरतात .
4. व्यक्तीचा मूड ताजातवाना राहण्यास मदत होते
5. घरी राहून किंवा नेहमीच्या ऑफिस स्पेसमधून काम करण्याऐवजी, वर्केशन तुम्हाला तुमचे काम पूर्ण करताना नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्याची परवानगी देते.
वर्केशन हा एक प्रकारचा प्रवास आहे ज्यामध्ये काम आणि विश्रांतीची सांगड घालणे समाविष्ट आहे. इंटरनेट कनेक्शनसह कुठूनही काम करू शकणाऱ्या दूरस्थ कामगार, फ्रीलांसर आणि उद्योजकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.कित्येक कंपन्या आता वर्केशन ही पॉलीसी स्वीकारत आहेत. मात्र या वर्केशन दरम्यान किती तास काम करायचे याचा समतोल जर राखला गेला तर काम आणि आराम याचा समतोल राखला जाईल. योग्य जागा, चांगले नेटवर्क आणि शिस्तपूर्वक काम केल्यास वर्केशनचा अनुभव चांगला येतो.