Chocolate Face Pack : 'हे' 5 चॉकलेट फेसपॅक चेहऱ्यासाठी वरदान
चॉकलेट आवडत नाही आशा व्यक्ती क्वचितच सापडतील. अनेकदा कोणाला गिफ्ट द्यायचे असतील, तसेच मूड ठीक करायचा असेल तर चॉकलेट हा एक उत्तम पर्याय मानला जातो. पण या चॉकलेट्सचे चेहऱ्यासाठीदेखील अजूनही काही फायदे आहेत. चॉकलेट मास्क चेहऱ्याला लावल्याने चेहरा एकदम चमकदार दिसतो. पण चॉकलेटमध्ये असे कोणते गुणधर्म असतात ? ज्यामुळे त्वचेला फायदा होतो, त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
चॉकलेट चेहऱ्याला लावणे कितपत योग्य आहे? तसेच हानिकारक आहे का? त्याबद्दल अनेकांना माहिती नाही आहे. याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
चॉकलेट त्वचेसाठी किती फायदेशीर ?
डार्क चॉकलेट्समध्ये कॅटेचीन, पोलिफेनोल. अॅंटीऑक्सिडंट्स आणि फ्लेवनॉल्स असतात. डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स कोलेजन उत्पादनात देखील मदत करतात. जे तुम्हाला चमकदार आणि निर्दोष त्वचा देते.
चॉकलेटने बनवा हे 5 फेस मास्क
डार्क चॉकलेट फेस मास्क
हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 डार्क चॉकलेट, 4-5 चमचे दूध, 3 चमचे ब्राऊन शुगर आणि 1 चमचा मीठ लागेल. नंतर चॉकलेट वितळवा आणि त्यात मीठ आणि साखर घाला. थंड झाल्यावर, ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यास मदत करतो.
चॉकलेट आणि केळीचा फेस मास्क
चॉकलेट आणि केळीचा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे कोको पावडर, 1 चमचा मध, अर्धा कप मॅश केलेले केळे आणि 1 चमचा दही लागेल. हे सर्व पदार्थ मिसळा, नंतर त्याची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे तो तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतो.
चॉकलेट आणि ओटमीलने मिळवा निर्दोष त्वचा
हा फेस मास्क बनवण्यासाठी अर्धा कप कोको पावडर, 3 चमचे ओटमील, 1 चमचा क्रीम आणि मध मिसळा. नंतर ते चेहऱ्यावर आणि मानेवर 20 मिनिटे लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हा फेस मास्क वापरू शकता.
चॉकलेट आणि बेसनाचा मास्क तुमची त्वचा उजळवेल
हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे बेसन, 2 चमचा दही, अर्धा कप कोको पावडर आणि अर्धा लिंबू लागेल.हे सर्व पदार्थ मिसळा आणि नंतर हा फेस मास्क चेहऱ्यावर 30 मिनिटे लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते.
चॉकलेट आणि हळदीच्या फेस मास्कने मिळवा चमकदार त्वचा
हा मास्क बनवण्यासाठी 2 चमचे कोको पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचे दूध एकत्र करून चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. यामुळे तुम्हाला निर्दोष आणि चमकदार त्वचा मिळेल.