Online Food : Swiggy चा ग्राहकांच्या जीवाशी खेळ ! आशा ठिकाणी बनतात तुम्ही मागवलेले पदार्थ

कदाचित असे पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करुन तुम्ही तुमच्या जिवाशी खेळ करत असता, याचे एक मोठे उदाहरण आता समोर आले आहे.
Published by :
Shamal Sawant

आजकाल ऑनलाइन पदार्थ मागवण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. आपण जे पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करतो ते कुठे तयार होतात ? कशा प्रकारे तयार होतात? याबद्दल मात्र कल्पना ग्राहकांना नसते. कदाचित असे पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करुन तुम्ही तुमच्या जिवाशी खेळ करत असता, याचे एक मोठे उदाहरण आता समोर आले आहे.

शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी व्हिडीओ शेअर करत स्विगी या ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅपवर आरोप केलेत. अॅपवर दाखवण्यात येणारं उपहार गृह किंवा हॉटेल वास्तवात कसं आहे हे चित्रे दाखवताय. आपण खात असलेले आणि आकर्षकरित्या पॅक केलेले अन्न पदार्थ अतिशय निकृष्ट पद्धतीने आणि घाणेरड्या ठिकाणी बनवण्यात येत असल्याचा आरोप चित्रेंनी केला आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक करुन त्यांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचा आरोपही चित्रेंनी केला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबत काही कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com