Parle-G
Parle-Gteam lokshahi

Parle-G च्या या निर्णयाचं होतंय कौतुक, कंपनीचे नुकसान होईल का?

आता ग्राहकांना बिस्किटांसाठी पूर्वीइतके पैसे मोजावे लागणार नाहीत
Published by :
Shubham Tate

Parle-G : देशात वस्तू महाग होत असताना, पार्ले-जी बिस्किटाच्या किमतीत कपात करण्याच्या तयारीत आहे. बिस्किटांच्या किमती कमी करण्यासोबतच कंपनी पॅकेटचे वजनही वाढवू शकते. वाढत्या महागाईच्या काळात कंपनीने हे केले तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. (parle g biskit price decrease during increase inflation level in india)

किंमत किती टक्क्यांनी कमी होईल?

उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून बिस्किटांच्या किमतीत वाढ होत आहे. आता दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात. पार्ले-जी कंपनीचे प्रमुख मयक शहा सांगतात की, सध्याचा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास आगामी काळात बिस्किटांच्या किमती १० ते २० टक्क्यांनी घसरतील.

Parle-G
Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी रात्री मेगाब्लॉक

कंपनी किंमत कमी करण्याचा विचार का करत आहे?

जेव्हा शहा यांना विचारण्यात आले की, वाढत्या महागाईत कंपनी किमती वाढवण्याचा विचार का करत आहे? यावर ते म्हणाले की, आता हळूहळू शेतीमालाचे भाव कमी होत आहेत. गव्हाचे दरही खाली येत आहेत. त्याचबरोबर पामतेलाच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. यामुळेच कंपनी आपल्या बिस्किटांची किंमत कमी करण्याचा विचार करत आहे.

Parle-G
जर तुम्हाला या चांगल्या सवयी असतील तर शनि तुम्हाला कधीही त्रास देणार नाही

यामुळे कंपनीचे नुकसान होईल का?

किमती वाढण्याबाबत शहा म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून कंपन्यांकडे किमती वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता. कोविडमुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली, जी किमती वाढण्याचे प्रमुख कारण बनले. त्याचा परिणाम विक्रीवरही दिसून आला. अनेक कंपन्यांना काही प्रमाणात तोटाही सहन करावा लागला होता, पण आता मार्जिन सुधारले आहे. आता कंपनीच्या किमतीत घसरण झाली तर तिला कोणतेही नुकसान सोसावे लागणार नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 10 टक्के वाढ केली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात, खाद्य क्षेत्रातील प्रमुख पार्ले प्रॉडक्ट्सने उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन सर्व उत्पादनांच्या किमतीत पाच ते १० टक्क्यांनी वाढ केली होती. कंपनीने रस्क आणि केक विभागांच्या किमती अनुक्रमे 5-10 टक्के आणि 7-8 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. त्याचे सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्किट, पार्ले जी देखील त्यावेळी 6-7 टक्के महाग होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com