Post Workout Tips
Post Workout TipsTeam Lokshahi

Post Workout Tips: व्यायामानंतर 'ही' पेये प्या, शरीरात राहील एनर्जी

व्यायाम केल्यावर खुप घाम सुटतो. ज्याने शरीराला थकवा किंवा सुस्ती जाणवते. अशा स्थितीत व्यायामानंतर काही पेये अवश्य घ्यावीत जेणेकरून तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल.

व्यायाम केल्यावर खुप घाम सुटतो. ज्याने शरीराला थकवा किंवा सुस्ती जाणवते. अशा स्थितीत व्यायामानंतर काही पेये अवश्य घ्यावीत जेणेकरून तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल. शरीरातील ऊर्जेची कमतरता दूर करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट ड्रिंकचे सेवन करणे फायदेशीर ठरते. आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की व्यायामानंतर तुम्ही कोणते पेय प्यावे?

व्यायामानंतर या पेयांचे सेवन करा-

लिंबाचा रस

व्यायामानंतर तुम्ही लिंबूपाणी घेऊ शकता. कारण उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन केले तर तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

नारळ पाणी

वर्कआऊटनंतर नारळपाणीही पिऊ शकता. नारळाच्या पाण्यात साखरेचे प्रमाण कमी असते आणि त्यात इलेक्ट्रोलाइट, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर इतर पेयांऐवजी नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील कमजोरी दूर होईल.

ताक

व्यायामानंतर ताकही पिऊ शकता. ताक सेवन शरीरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते. हे प्यायल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल. यासोबतच तुमच्या पोटालाही आराम मिळेल.

Post Workout Tips
How to Lose Weight : वजन कमी करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा

टरबूज रस

उन्हाळ्यात वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही टरबूजाचा रसही घेऊ शकता. टरबूजमध्ये एमिनो अॅसिड असतात जे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढवतात. दुसरीकडे, जर तुम्हाला यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर टरबूजचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com