सतत चष्मा लावल्याने चेहऱ्यावर पडलेत डाग? 'या' घरगुती टिप्सने होतील नाहीसे

सतत चष्मा लावल्याने चेहऱ्यावर पडलेत डाग? 'या' घरगुती टिप्सने होतील नाहीसे

अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की चष्मा लावून लॅपटॉपसमोर तासनतास काम केल्यावर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर डाग पडतात

Spectacle Marks On The Nose : तुमच्याही डोळ्यांना चष्मा लागल्याने आणि तासन् तास कामादरम्यान चेहऱ्यावर चष्मा लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डाग दिसू लागले आहेत का? अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की चष्मा लावून लॅपटॉपसमोर तासनतास काम केल्यावर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर डाग पडतात. अशा स्थितीत तुम्ही काळजीत पडता. तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला घरगुती उपायांनी हे डाग घालवण्याचे सोप्पे उपाय सांगणार आहोत. चला जाणून घेऊया

सतत चष्मा लावल्याने चेहऱ्यावर पडलेत डाग? 'या' घरगुती टिप्सने होतील नाहीसे
लिंबाचा रस आणि मधात लावल्याने चेहरा होईल सॉफ्ट, 'या' समस्यांपासून मिळेल सुटका

संत्र्याची साल

संत्र्याची सालीमुळे चेहऱ्यावरील चष्म्याचे डाग दूर होण्यास मदत होते. संत्र्याची साल उन्हात वाळवा आणि नंतर बारीक करा. आता एक चमचा संत्र्याच्या साली पावडरमध्ये अर्धा चमचा दूध घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट डाग असलेल्या भागावर लावा आणि काही वेळाने धुवा. असे काही दिवस सतत केल्यावर डाग निघून जाण्यास सुरुवात होते.

काकडी

काकडीचे तुकडे डाग असलेल्या भागावर चोळा आणि काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.

लिंबाचा रस

थोड्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या मदतीने डाग असलेल्या भागावर लावा. काही वेळाने थंड पाण्याने धुवा. डाग हळूहळू नाहीसे होतील.

बदामाचे तेल

नाकावरील चष्म्याच्या खुणा दूर करण्यासाठी रोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल नाकाला लावावे. बदामाच्या तेलाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com