sweet potatoes benefits
sweet potatoes benefitsTeam Lokshahi

हिवाळ्यात रताळे खाण्याचे होतील 'हे' फायदे

हिवाळ्यामध्ये रताळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात

हिवाळ्यामध्ये रताळी (sweet potatoes benefits) खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ते खायला पौष्टिक आणि चांगले लागतात. तसेच रताळ्याला स्वीट पोटॅटोही म्हणतात. रताळ्याचा गर पांढरा, पिवळट रंगाचा असतो. रताळ्याचे सेवन उपवासातही केले जाते. रताळेमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आढळते. रताळी ही उकळून, भाजून तुम्ही खाऊ शकता. रताळ्यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळतात. तर चला जाणून घेऊया रताळे खाण्याचे फायदे.

रताळ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. पोटात गॅसचा त्रास होत असेल तर तुम्ही रताळ्याचे सेवन करू शकता. हिवाळ्यामध्ये रताळ्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी रताळ्याचे सेवन करू शकता. तसेच शरीराचा अशक्तपणाही दूर होण्यासाठी मदत करते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते.

sweet potatoes benefits
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळाचे करा सेवन

आपले वाढते वजन कमी करण्यासाठी रताळे हे खूप फायदेशीर असते. रताळ्याचे सेवन केल्याने आपल्याला जास्त भूक लागत नाही. त्यामुळे आपले वजनही नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com