Health
HealthLokshahi Team

अशाप्रकारे उष्माघातापासून स्वतःची काळजी घ्याल...

ऊन आणि गरम वाऱ्यामुळे आपल्यावर होऊ शकतो उष्माघाताचा परिणाम...
Published by :

उन्हाळा (summer)चालू झाला की शरीरातील गर्मी वाढू लागते आणि आपण देखील गरम पदार्थांकडे दुर्लक्ष करत प्रमाणात थंड पदार्थ (cold)खाण्यासाठी इच्छुक असतो.

बऱ्याच लोकांना उन्हामध्ये काम करून आल्यानंतर उष्माघात (Sunstroke) होण्याची शक्यता असते. उष्ण वारे आणि कडक ऊन यामुळे उष्माघाताचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मग डोकेदुखी, उलटी येणे, मळमळ होणे यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी काय करावं हे आपण सविस्तर जाणून घेऊया .

Health
यंदा जाणवतोय सर्वात जास्त उन्हाळा; नासाने सांगितले त्यामागील कारण...

तापमान 45 अंशाच्या पुढे गेल्यावर कुणीही उष्माघाताने बळी पडू शकतो. उष्णता जास्त वाढली की आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी व्हायला सुरुवात होते. दही आणि मिठाचे ताक उन्हाळ्यात सेवन केल्यास टॉनिकची देखील गरज भासणार नाही. शक्यतो सकाळी १० पासून ते संध्याकाळी ५ पर्यंत घराबाहेर निघणे टाळावे. भर उन्हात बाहेर निघायचे झाल्यास डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी.

अशावेळी नारळाच्या पाण्याचे सेवन करावे त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स परत मिळवण्यासाठी मदत होऊ शकते.

उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास ऊन आणि गरम वारा याचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर एकच पर्याय तो म्हणजे पाणी पुरेसे आणि वेळोवेळी प्यावे. यामुळे शरीरातील तापमान कमी होण्यात देखील मदत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com