आयुष्यभर वीज बिल भरुच नका; छतावर बसवा हे डिव्हाईस, घरीच तयार करा Electricity

आयुष्यभर वीज बिल भरुच नका; छतावर बसवा हे डिव्हाईस, घरीच तयार करा Electricity

भारतातील मोठ्या ग्रामीण भागात अजूनही विजेचे संकट आहे. देशाच्या काही भागात अजूनही जनतेला वीजपुरवठा सुरळीत होत नाही. तर दुसरीकडे ज्यांना वीज मिळतेय ते वाढीला वीजबिलामुळे त्रस्त आहेत.
Published by :
shweta walge

भारतातील मोठ्या ग्रामीण भागात अजूनही विजेचे संकट आहे. देशाच्या काही भागात अजूनही जनतेला वीजपुरवठा सुरळीत होत नाही. तर दुसरीकडे ज्यांना वीज मिळतेय ते वाढीला वीजबिलामुळे त्रस्त आहेत. सरकारकडून गेल्या काही महिन्यात अनेकदा वीजबिले वाढवण्यात आले आहेत. याच थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही घराच्या छतावर बसवल्यानंतर दरवर्षी तुम्ही ३० ते ४० हजारांपर्यंत वीजबिलाची बचत करू शकता.

ट्यूलिप वाईंड टरबाईन हे एक उभे हवेद्वारे ऊर्जा तयार करणारे उपकरण आहे. म्हणजे त्यामुळे वीज निर्मिती करता येते. या टरबाईनचे एक फूल ट्यूलिपच्या फुलासारखे दिसते. त्यामुळेच त्याला ट्यूलिप वाईंड टरबाईन असे नाव देण्यात आले आहे. हे टरबाईन कमी हवा असताना पण विद्युत निर्मिती करते. हे घरगुती वापरासाठी चांगले उपकरण मानण्यात येते.

कसे काम करते हे उपकरण

ट्यूलिप टर्बाइ (Tulip Wind Turbine) हे एक पवन ऊर्जा जनरेटर आहे. खरं तर पवन ऊर्जा खर्चिक असलयाने कोणी त्याचा वापर करत नाही. परंतु यासाठी एकदाच पैसे खर्च केल्यास आयुष्यभर तुम्हाला कमी लाईट बिल येऊ शकेल. म्हणजेच हे एक वन टाइम इन्व्हेस्टमेन्ट टर्बाइन आहे जे तुम्ही तुमच्या घराच्या छतावर लावू शकता. त्यात एक पॉवर जनरेटर बसवला आहे ज्याच्या मदतीने वीज निर्मिती सुरू होते. ट्यूलिप टरबाईनच्या पंखे हवेच्या दबावामुळे फिरतात. त्यामाध्यमातून विद्युत तयार होते. वीज तयार झाल्यावर ती घरातील पंखे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वीजेचा पुरवठा करते. त्यामुळे तुमच्या घरातील सर्वच उपकरणे सुरु राहतात. विशेष म्हणजे हवा कमी असताना सुद्धा हे उपकरण उपयोगी पडते.

ट्यूलिप टरबाईनचा खर्च तरी किती

ट्यूलिप वाईंड टरबाईनचा खर्च हा त्याच्या आकारानुसार आहे. साधारणपणे ट्यूलिप वाईंड टरबाईन बसविण्याचा खर्च हा 50 हजार ते 2 लाख रुपयांदरम्यान आहे. लक्षात घ्या ही केवळ अंदाजित किंमत आहे. त्यापेक्षाही खर्च कदाचित लागू शकतो. तुमची गरज, जागा यानुसार हा खर्च वाढू शकतो. तंत्रज्ञाच्या आधारे तुम्ही हे उपकरण छतावर बसवू शकता. यासंबंधीची सबसिडीची महिती तुम्हाला कंपनीकडून मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com