घनदाट  आणि काळ्या केसांसाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

घनदाट आणि काळ्या केसांसाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरतात. पण ही उत्पादन केसांसाठी हानिकारक ठरू शकतात.
Published by :
shweta walge

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरतात. पण ही उत्पादन केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केस काळे ठेवण्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकतात. खोबरेल तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेलासोबत पुढील गोष्टींचा वापर केल्याने केस निरोगी आणि काळे राहू शकतात.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता

खोबरेल तेल आणि कढीपत्त्याचा वापर करून केस काळे ठेवता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये दहा ते पंधरा कढीपत्ते मिसळून घ्या. त्यानंतर तुम्हाला हे तेल कोमट करून घ्यावे लागेल. या तेलाने तुम्हाला केसांना हलक्या हाताने मसाज कराव. त्यानंतर साधारण तीन तासांनी तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील.

खोबरेल तेल आणि मेथीचे दाणे

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये मेथी दाणे मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकून तेल कोमट करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल गाळून घ्यावे लागेल. या तेलाने केसांना नियमित मसाज केल्याने केस निरोगी राहू शकतात.

खोबरेल तेल आणि कांद्याचा रस

केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेल आणि कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कांद्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित उकळून घ्यावे लागेल. हे तेल कोमट झाल्यानंतर तुम्हाला ते केसांना लावावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केस काळे राहतात आणि केसांची वाढही जलद होते.

मोहरीचे तेल आणि मेथी

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मेथीचा वापर करू शकतात. कारण या दोन्हीमध्ये विटामिन ई, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या दाण्याची पेस्ट तयार करून मोहरीच्या तेलामध्ये मिसळून घ्यावी लागेल. हे तेल तुम्हाला साधारण एक तास केसांना लावून ठेवावे लागेल. एका तासानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागतील.

खोबरेल तेल आणि कोरफड

तुम्ही जर केस वाढवण्याचा विचार करत असाल, तर खोबरेल तेल आणि कोरफडीचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण हलक्या हाताने केसांना लावावे लागेल. साधारण एक तास हे मिश्रण केसांवर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस मऊ, लांब आणि चमकदार होऊ शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com