Vitamin D
Vitamin DTeam Lokshahi

Vitamin D | व्हिटॅमिन-डीची कमतरता या पदार्थांनी पूर्ण करा

शरीर सुरळीत चालण्यासाठी अनेक प्रकारांच्या पोषक तत्वांची गरज असते
Published by :
Team Lokshahi

शरीर सुरळीत चालण्यासाठी अनेक प्रकारांच्या पोषक तत्वांची गरज असते, त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डी. (Vitamin D)शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, सांधेदुखी, पाठदुखी याशिवाय स्नायू दुखण्याच्या तक्रारीही असू शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये, व्हिटॅमिन डीच्या (Vitamin D)कमतरतेमुळे संधिवात, मुडदूस आणि ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. सूर्यप्रकाश सुद्धा शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करू शकतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हात उभे राहणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता कशी भरून काढायची, असा प्रश्न निर्माण होतो. तर मग जाणून घेऊया अशाच काही फळांबद्दल आणि पदार्थांबद्दल जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.

अंडी (eggs)- अंडी हे पोषक तत्वांचे भांडार आहे. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी देखील आढळते. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही रोज एक अंड्यातील पिवळ बलक खावे.

गाईचे दूध (milk) - गाईच्या दूधात व्हिटॅमिन डीचे प्रमाण खूप असते. दूध हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्ही 1 ग्लास गाईचे दूध प्यायले तर तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळते.

दही - दह्याचे सेवन केल्याने तुम्ही व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढू शकता.

मासे (fish) - मांसाहारासाठी मासे हा व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. हेरिंग, मॅकेरल, सॅल्मन आणि ट्यूना यासारख्या माशांपासून तुम्ही व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकता.

संत्री (orange)- अशी फार कमी फळे आहेत ज्यात व्हिटॅमिन डी आढळते. व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढण्यासाठी संत्री फार फायदेशीर ठरते. संत्र्याच्या रसात पोषक घटक सोबतच कैल्शियम पण आढळते.

केळी (bannana)- केळी हे व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. कारण केळीमध्ये मॅग्नेशियम जास्त असते, जे व्हिटॅमिन डी एक्टिवेट करते.

पपई - पपईमध्ये व्हिटॅमिन डी सोबतच व्हिटॅमिन बी आणि सी देखील जास्त प्रमाणात आढळते. त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम आढळतात.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे

1. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि पाठदुखीचा त्रास होतो.

2. जर तुमचे केस जास्त गळत असतील किंवा पांढरे होत असतील तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण आहे.

3. जर स्नायूंमध्ये वेदना होत असेल तर ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण आहे.

4. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जखमा भरण्यास उशीर होतो.

5. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते ज्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडता.

6. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर सुस्ती आणि आळशीपणा येतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com