आजच्या फॅशनच्या युगात प्रत्येकाला आपला लूक आकर्षक, क्लासी आणि आधुनिक दाखवायचा असतो. यासाठी बरेच जण महागडे ब्रँडेड कपडे, डिझायनर आउटफिट्स किंवा विविध फॅशनेबल अॅक्सेसरीजवर भरपूर खर्च करतात. मात्र, स्टायलिश दिसण्यासाठी नेहमीच मोठा खर्च करावा लागतो, असे नाही. खरंतर, योग्य रंगसंगतीची निवड केली, तर अगदी साधे कपडेही तुमचा लूक रॉयल आणि एलिगंट बनवू शकतात. तुमची ऑफिसची महत्त्वाची मीटिंग असो, डेटनाईट असो किंवा एखादा खास प्रसंग योग्य कलर कॉम्बिनेशन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवते. चला तर मग जाणून घ्या अशाच काही खास रंगसंगती, ज्या आजच्या ट्रेंडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी ठरल्या आहेत.
नेव्ही ब्लू आणि व्हाईट हे एक अतिशय क्लासी व सुरक्षित कॉम्बिनेशन आहे. ऑफिस मीटिंग असो वा डेट नाईट, नेव्ही ब्लू ब्लेझरसोबत पांढरा शर्ट किंवा ड्रेस नेहमीच इम्प्रेस करतो. हा कॉम्बिनेशन फारसा अॅक्सेसरीजशिवायही प्रेझेन्स निर्माण करतो.
आजच्या न्यूट्रल ट्रेंडमध्ये बेज आणि ब्राउन हे सर्वोत्तम कॉम्बिनेशन मानले जाते. बेज ट्राउझर्ससोबत हलकासा ब्राउन शर्ट किंवा टॉप तुमच्या लूकमध्ये कमालीचा सौंदर्यपूर्ण परिपक्वतेचा टच देतो. हा लूक प्रत्येक हंगामात आणि प्रसंगात उठून दिसतो.
काळा आणि ग्रे हे नेहमीच काळाच्या पुढे असलेले कलर कॉम्बिनेशन आहे. ब्लॅक शर्टसोबत ग्रे पँट किंवा टॉप हा लूक खूपच डॅशिंग आणि सॉफिस्टिकेटेड वाटतो. अॅक्सेसरीज कमी ठेवूनही हा लूक आपली छाप सोडतो.
ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट हे सध्याच्या कॅज्युअल लूकसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे. व्हाईट टॉपसह ऑलिव्ह ग्रीन पँट किंवा स्कट घालून तुम्ही वीकेंड ब्रंच, कॅज्युअल डेट किंवा आउटिंगला एक स्टायलिश इम्प्रेशन निर्माण करू शकता.
पांढऱ्या रंगासोबत सोनेरी टच दिला, तर तुमचा लूक थेट शाही वाटतो. पांढऱ्या पोशाखासोबत गोल्डन अॅक्सेसरीज, पादत्राणे किंवा छोटासा हायलाईट दिला तरी तुम्ही गर्दीत उठून दिसाल. हा लूक पार्टी, समारंभ किंवा खास संध्याकाळीसाठी परिपूर्ण आहे.