smoking
smokingTeam Lokshahi

सिगारेट सोडायची आहे? तर हे उपाय करूनच पहा

धुम्रपानाचे हे इतके वाईट व्यसन आहे की...
Published by :
Siddhi Naringrekar

धुम्रपानाचे हे इतके वाईट व्यसन आहे की केवळ धूम्रपान करणार्‍यालाच नव्हे तर त्याचे कुटुंब आणि त्याच्या जवळच्या लोकांना देखील धूम्रपानाच्या परिणामांना सामोरे जावे लागते. धुम्रपानामुळे कर्करोग, कोलन अशा आजारांचा धोका वाढतो.

सिगारेट जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातली व्हिटॅमिन सीची कमतरता होते. असे अनेक लोक आहेत ज्यांना सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे. मात्र ही सवय सोडता येत नाही. हे खरे आहे की, एकदा धुम्रपानाची सवय लागली की, ती जाता जात नाही. मात्र यावर आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत.

सिगारेटची सवय सोडायची असेल तर तुम्ही मधाचाही वापर करू शकता. वास्तविक मधामध्ये जीवनसत्त्वे, एन्झाईम्स आणि प्रथिने असतात, जी तुम्हाला धूम्रपान सोडण्यास मदत करू शकतात.

तुमच्या दिवसाची सुरुवात न्याहारी, कसरत, ध्यान आणि कामाने करा. तसेच, वाचन, बागकाम . तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये तुम्ही मन रमवा

लिकोरिस ही एक औषधी वनस्पती आहे जी सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकते. हे टॉनिक म्हणून काम करते. यामुळे थकवा येत नाही, जे सहसा सिगारेट ओढणाऱ्यांसाठी एक निमित्त असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com