Mangoes in India : भारतातील आंब्याच्या प्रसिद्ध जाती कोणत्या आणि त्यांना ओळखायची पद्धत; जाणून घ्या
फळांचा राजा आणि सर्वांचे आवडते फळे म्हणजे आंबा. आंब्याच्या १५०० जाती भारतात आढळतात आणि प्रत्येक जातीची चव, आकार आणि रंग वेगळा आहे. तोतापुरी, देवगडचा हापूर आणि बिहारमधील मालदा जाती भारतीय बाजारपेठांवर एप्रिल मध्य ते ऑगस्ट या कालावधीत राज्य करतात. आंब्यांच्या याच एकूण १५ प्रसिद्ध जातींबद्दल जाणून घेऊया.
हापूस
कोकणातला हापूस आणि महाराष्ट्र हे वेगळ नातं. हापूसचा कितीही दर वाढला असला तरी लोकांकडून त्याची मागणी कमी होत नाही. संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूनही याला जास्त मागणी आहे. मग यामध्ये देवगड हापूस असेल, रत्नागिरी हापूस असेल असे अनेक प्रकार मोडतात.
हापूस आतून केशरी आणि त्याचे साल पातळ असते. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा जातो. इतर राज्यातील आंबा हा बाहेरून हिरवा तर आतून पिवळा असतो. थोडा रसाळ आणि त्याचा आकार उभट असतो.
तोतापुरी
कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील, हा आंबा चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा असतो. हा आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. सलाड आणि लोणच्यासाठीही उत्तम आहे.
सिंधूरा
हा आंबा दिसायला वेगळा असून त्याची साल बाहेरून लाल आणि पिवळी असते. या आंब्याची चव आंबट-गोड असून याची चव तुमच्या तोंडात बराच काळ रेंगाळेल. शेक तयार करण्यासाठी हे खूप चांगले आहे.
चौसा
उत्तर भारत आणि बिहारमध्ये ही लोकप्रिय जात शेरशाह सूरीने सोळाव्या शतकात त्याच्या कारकिर्दीत आणली होती. ह्या जातीला बिहारमधील एका शहराचे नाव दिले गेले आहे. हा आंबा पिवळ्या-सोनेरी रंगाचा असतो. त्याच्या पिवळ्या-सोनेरी रंगाने सहज ओळखता येतो.
बंगीनापल्ली
या आंब्याची साल त्याची साल पिवळसर रंगाची असून त्यावर काही डाग असतात आणि फळ अंडाकृती आकाराचे असते. या आंब्याच्या जातीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बानागनपल्ले येथे केले जाते.
पायरी
पायरी या आंब्याच्या सालीला तांबूस रंगाची छटा आणि चवीला आंबट असे हे फळ गुजरातमध्ये आमरस बनवण्यासाठी जास्त वापरतात.
रासपुरी
हा आंबा मे महिन्यात येतो आणि जूनच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होतो. दही, स्मूदी आणि जामच्या मध्ये ह्याचा उत्तम वापर केला जातो. कर्नाटकातील जुने म्हैसूर येथे मोठ्या प्रमाणावर पिकवली जाणारी ही जात भारतात आंब्याची राणी म्हणून ओळखली जाते.
मालदा
आंब्यांच्या तुलनेत याचे आवरण पातळ असते आणि त्याला गोड सुगंध असतो. बिहारमधील ‘आंब्याचा राजा’ म्हणून ओळखले जाणारा मालदा आंबा चवीला गोड-आंबट असून तो रसाळ आणि स्वादिष्ट आहे.
केसर
सर्वात महागड्या जातींपैकी एक जात. आंबाच्या रंग केशरसारखा दिसतो, . या जातीची लागवड जुनागढच्या नवाबांनी १९३१ मध्ये प्रथम केली आणि १९३४ मध्ये त्याचे नाव केसर ठेवण्यात आले.
लंगडा
पाय नसलेल्या माणसाच्या शेतात पहिल्यांदा त्याची लागवड केली गेली होती, म्हणून या आंब्याच्या जातील लंगडा म्हणतात. ते जुलै ते ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होतात. लंगडा हा आंब्याची एक प्रसिद्ध जात आहे, जिचा उगम उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला आहे.
बदामी
या जातीच्या सालीला चमकदार सोनेरी पिवळा लाल रंगाची छटा असते जी फळाच्या वरच्या बाजूला पसरते. बदामी ही कर्नाटकातील आघाडीची आंब्याची जात असून एप्रिल ते जुलै या कालावधीत हा आंबा बाजारात येतो.
नीलम
नीलम ही जात देशाच्या प्रत्येक भागात पिकवली जाते. सामान्यतः जूनमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. त्यांची साल केशरी असते आणि आंब्याच्या इतर जातींच्या तुलनेत आकाराने लहान असते.
मालगोवा
या आंब्याचा ३००-५०० ग्रॅम वजनाचा लहान तिरकस गोलाकार आकार असतो. ज्यावर पिवळ्या छटासह हिरवा रंग असतो. हे आंबे बहुतेक मे आणि जूनमध्ये उपलब्ध होतात.
हिमसागर
हा आंबा मध्यम आकाराचे, पिवळ्या सालीसह हिरव्या रंगाचे असतोगोड सुगंध आणि पश्चिम बंगाल, ओरिसाची खासियत असलेलं हे फळ मध्यम आकाराचे असून त्याचे वजन २५०-३५० ग्रॅम दरम्यान असते.