Skin Care Tips : तुमच्या त्वचेसाठी योग्य फेसवॉश कोणता?
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची उष्णता आहे. वाढलेल्या गर्मीमुळे सगळेच हैराण झाले आहेत. या उन्हामध्ये आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्वचेची काळजी घेणंदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. घाम, धूळ आणि वातावरणामुळे त्वचा अधिक चिकट होते. आजकाल चेहरा साफ करण्यासाठी फेसवॉशचा वापर केला जातो. पण जर योग्य फेसवॉश निवडला नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. त्यामुळे तुमच्या त्वचेनुसार फेसवॉश निवडणे गरजेचे असते. त्यामुळे आता उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण आता जाणून घेऊया.
कोरडी त्वचा (Dry Skin) :
कोरडी त्वचा असणाऱ्यांनी फेसवॉशची निवड योग्यरित्या करावी. जर कोरड्या त्वचेसाठी चुकीचा फेसवॉश निवडला तर त्यामुळे तुमची त्वचा ताणल्यासारखी दिसू शकते. अशा प्रकारच्या त्वचेसाठी अत्यंत सौम्य असा फेसवॉश निवडावा. यासाठी तुम्ही कोरफड असलेला फेसवॉश वापरल्यास त्वचा तजेलदार राहते. त्याचप्रमाणे मायसेलर वॉटर किंवा दुधयुक्त क्लींजर चांगले असतात. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो.
संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) :
संवेदनशील त्वचेसाठी योग्य क्लीन्सर निवडणे खूप महत्वाचे आहे.संवेदनशील त्वचा खूप लवकर लाल, खाज सुटू शकते. तसेच चुकीचे क्लींजर लावल्याने देखील ऍलर्जी आणि चिडचिड होऊ शकते. आशा त्वचेसाठी संवेदनशील त्वचेसाठी, कमी रसायने असलेले सौम्य क्लीन्सर निवडा. फेस वॉशमध्ये कॅमोमाइल, कोरफड किंवा ओटमीलसारखे नैसर्गिक घटक असले पाहिजेत, जे त्वचेला आराम देतात. म्हणून, सुगंध-मुक्त आणि साबण-मुक्त क्लींजर वापरा.
तेलकट त्वचा (Oily Skin):
तेलकट त्वचा असलेल्या चेहऱ्यावर जास्त सिबम (तेल) तयार होते, ज्यामुळे चेहरा चिकट दिसतो. घाम आणि घाणीमुळे मुरुमे आणि ब्रेकआउट्सची समस्या देखील वाढते. आशा त्वचेसाठी सॅलिसिलिक अॅसिडयुक्त फेसवॉशचा वापर करा. जेल-आधारित किंवा फोमिंग क्लीन्सर वापरल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि अतिरिक्त तेल जमा होत नाही.
सामान्य त्वचा (Normal Skin) :
सामान्य त्वचा असणाऱ्यांनी चुकीचा फेसवॉश वापरल्याने त्वचा कोरडी किंवा तेलकट होऊ शकते. अशा परिस्थितीत, सामान्य त्वचा असलेल्या लोकांनी देखील योग्य क्लींजर निवडावे. यासाठी लिंबू, मध, कोरफड किंवा गुलाबजल असलेले फेसवॉश हे चांगले पर्याय आहेत.