Nose Piercing : नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात?

Nose Piercing : नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात?

नाकाच्या डाव्या बाजूला नथ का घालतात? शोधा या पारंपारिक प्रथेचे गुपित आणि आरोग्य फायदे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

सर्वच मुलींना दागिने घालायला खूप आवडतात. सोन्या चांदीचे वेगवेगळे दागिने महिला मुली गळ्यात परिधान करतात. मात्र हीच प्रथा अजूनही कायम ठेवण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना विशेष महत्व आहे. मागील अनेक वर्षांपासून मुलं जन्माला आल्यानंतर कान आणि नाक टोचण्याची प्रथा आहे. कान आणि नाक टोचल्यानंतर त्यात सोन्याचे दागिने घातले जातात. लग्न झाल्यानंतर महिला पैंजण, जोडवी, नथ इत्यादी दागिने घालतात. पण तुम्हाला माहिती आहे का? नथ डाव्या बाजूला का घालतात जाणून घ्या...

नाकात नथ घाल्यामुळे चेहरा तर सुंदर दिसतोच पण आरोग्यला सुद्धा अनेक फायदे होतात. महिलांनी शुभ प्रसंगी नथ घालावी, ज्यामुळे महिलांचे सौंदर्य वाढते. शिवाय रोजच्या वापरात सोन्याची किंवा चांदीची नथ घालणे शुभ मानले जाते.

मुली आणि विवाहित महिला नाकाच्या डाव्या बाजूलाच नथ घालतात. डाव्या बाजूला प्रामुख्याने नाक टोचले जाते. पण असे मानले जाते की नाकाचा डावा भाग हा मासिक पाळीशी संबंधित असतो. नथ घालण्यासाठी नाकात तयार केलेले छिद्र मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे नेहमी डाव्या बाजूला नाक टोचले जाते. लग्न सोहळ्यात किंवा कार्यक्रमात महिला नाकात सोन्याची नथ परिधान करतात. नाकात नथ घातल्यामुळे नाकाचे सौंदर्य वाढू लागते. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नथ उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही मोत्याची, डायमंड किंवा चांदीमध्ये नथ परिधान करू शकता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com