Lakshmi Pujan 2025 : यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार?
थोडक्यात
दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर
दिवाळीत अमावस्येचे मोठे महत्त्व, तिथीवरून गोंधळ..
यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार?
दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर आहे. अशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. प्रकाशाचा दिवाळी हा सण आहे, जो दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवितो. यंदा दिवाळी साजरी करण्याच्या योग्य तारखेबद्दल काही गोंधळ आहेत. दिवाळीचा सण हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. दिवाळीत हे सण यंदा म्हणजेच 2025 च्या नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत आणि यंदाची दिवाळी कधी आहे, अनेकांच्या मनात याबाबत संभ्रम आहे. याविषयी जाणून घेऊयात.
दिवाळीत अमावस्येचे मोठे महत्त्व, तिथीवरून गोंधळ..
दिवाळी, ज्याला दिव्यांचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते, हा एक प्रमुख सण भारतीय संस्कृतीतील आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विशेष महत्त्वाची आहे. दिवाळी अमावस्येला येते, जेव्हा आकाशात चंद्र दिसत नाही आणि अंधार असतो. या अंधारात घरांमध्ये दिवे लावणे हे लक्ष्मी देवीचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि रात्री दिवे लावणे हे दर्शवते की आपण आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधार दूर करत आहोत आणि ज्ञान, समृद्धी आणि प्रकाशाला आमंत्रित करत आहोत. 20 आणि 21 ऑक्टोबर दोन्ही दिवशी मात्र यंदा येणाऱ्या अमावस्या तिथीमध्ये अनिश्चितता आहे, जाणून घ्या...
यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार?
धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. या दिवशी मुख्यतः खरेदी करणे आणि लक्ष्मी-कुबेर पूजेला विशेष महत्त्व आहे. घरात सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास संपत्ती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. या वर्षी खरेदीसाठी शुभ वेळ दुपारी 12:18 पासून 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:51 पर्यंतचा वेळ आहे.
दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यंदा कार्तिक अमावस्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 वाजता सुरू होऊन 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:54 वाजेपर्यंत चालणार आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते 8:18 पर्यंत आहे. त्यामुळे दिवाळीचा मुख्य सण 20 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.