Jharkhand: संतापजनक! मुख्याध्यापकाने 100 मुलींना शर्ट काढायला लावल्याने खळबळ

Jharkhand: संतापजनक! मुख्याध्यापकाने 100 मुलींना शर्ट काढायला लावल्याने खळबळ

झारखंडच्या धनबादमध्ये मुख्याध्यापकाने 100 विद्यार्थिनींना शर्ट काढायला लावल्याने खळबळ! पालकांनी केली कारवाईची मागणी, व्हिडीओज व्हायरल.
Published by :
shweta walge
Published on

झारखंडमधील धनबादमधील एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्याध्यापकाने  सुमारे 100  विद्यार्थिनींना शर्ट काढूण शर्टशिवाय घरी पाठवण्यात आले. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचे काही व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी शनिवारी धनबाद जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दहावीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पेन डे’चं आयोजन केलं होतं. यात जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अनेकांनी एकमेकांच्या शर्टवर पेनने शुभेच्छा लिहिल्या होत्या. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मुख्याध्यापकाने दहावीच्या विद्यार्थिंनी अजब शिक्षा दिली. दहावीच्या विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढून फक्त ब्लेझर घालून घरी जाण्यास भाग पाडलं, याबाबतचा आरोप शाळेतील विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी केला आहे.

घडलेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. पालकांनी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी काही पीडित मुलींची चौकशी केली असून प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत असल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com