नंदूरबारमध्ये एका महिन्यात ११८ कुपोषित बालकांचा मृत्यू

नंदूरबारमध्ये एका महिन्यात ११८ कुपोषित बालकांचा मृत्यू

Published by :
Published on

प्रशांत जव्हेरी | नंदुरबार | राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक घोषणा होतात हजारो कोटींचा निधी खर्च होत असतो, मात्र आदिवासी दुर्गम भागात या योजना पोहचतात का? आणि या भागातील आरोग्य यंत्रणा तितक्या सक्षम आहेत का? हा सवाल या ठीकाणी उपस्थित होत आहे. कारण नंदुरबार जिल्ह्यात एकाच महिन्यात तब्बल ११८ बालमृत्यू झाले आहेत. सरासरी विचार केल्यास तर दिवसाला चार बालकांचा मृत्यू होत असल्याच समोर आले आहे.

राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात १२ प्रकल्पात २९९२ बालकांचा जन्म झाला आहे. त्यात ११८ शून्य ते सहा वर्ष वयाच्या बालकांच्या मृत्यू झाला आहे .यात शून्य ते २८ दिवसाच्या ३५ बालकांचा तर एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ३८ एक ते पाच वर्ष २० उपजत बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा बालमृत्यू दराचा दुप्पट आहे. दुर्गम भागातील अंगणवाड्या बंद असतात पोषण आहार पोचत नाही दुसऱ्याकडे बालमृत्यूचा संशोधन अहवाल सादर केला जात नसल्याचा आरोप समाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाय योजना सुरु करण्यात आल्या आहेत झालेल्या बालमृत्यूच्या कारणांचा वस्तुस्थिती दर्शक रिपोर्ट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात बालमृत्यू रोखण्यासाठी असलेल्या समितीची बैठक गेल्या पाच वर्षात झाली नव्हती ती आता घेतली असून दर तीन महिन्यांना घेण्यात येणार असल्याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com