Sangli Crime : संतापजनक! गरोदर महिलेने सासरच्यांच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

सांगली गुन्हा: उच्चशिक्षित गरोदर महिलेने धर्मांतरण छळाला कंटाळून आत्महत्या केली.
Published by :
Riddhi Vanne

पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे संपुर्ण महाराष्ट्र हदारुन गेले आहे. आता सांगलीतमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित गरोदर ऋतुजाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सांगलीच्या अश्विनी सोसायटी येथील सासरच्या राहत्या घरी तिने गळफास लावून आत्महत्या केली, मिळालेल्या माहितीनुसार, मयत ऋतुजा राजगेने हीचा वांरवार छळ केला जात होता. ती गरोदर असताना ख्रिश्चन धर्मांप्रमाणेच गर्भसंस्कार करण्याचा दबाव सासू- सासरे टाकत होते. त्यामुळे सात महिन्याची गर्भ असताना जगाचा निरोप घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com