Kolhapur Crime : कोल्हापूर हादरले! लिव्ह-इनमध्ये राहण तरुणीच्या जीवावर बेतलं; तिने लग्नाला नकार दिला म्हणून....

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरले! लिव्ह-इनमध्ये राहण तरुणीच्या जीवावर बेतलं; तिने लग्नाला नकार दिला म्हणून....

कोल्हापूरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीने लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने तिला जीवे मारलं.
Published by :
Prachi Nate
Published on

कोल्हापूरच्या सरनोबतवाडी तालुका करवीर येथे मंगळवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने धारधार शस्त्राने तिचा निर्घृण खून केला. तरुणीचे वय 23 होते. ती राहणार दत्त मंदिर रोड, कसबा बावडा येथे राहत होती. या घटनेनंतर संशयित सतीश मारुती यादव (वय 25, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर; सध्या रा. साकोली कॉर्नर) हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व गांधीनगर पोलिसांची संयुक्त पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दोघे एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होते व गेल्या चार महिन्यांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होते. सतीशने समीक्षेस लग्नाची मागणी केली होती, मात्र तिने नकार दिला. त्यातूनच संतप्त होऊन त्याने धारधार चाकूने तिच्या छातीत वार केले. इतकी अमानुषता होती की चाकू तिच्या बरगडीतच अडकला होता.सतीश यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सरनोबतवाडी व परिसरात प्रचंड खळबळ माजली असून नागरिक व नातेवाईकांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात गर्दी केली. वरिष्ठ पोलिस अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत. कोल्हापूर शहरातील वाढती गुन्हेगारी हे येथील पोलिसांपुढे एक मोटगे आव्हान ठरत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com