Crime
Ashok Dhodi: अशोक धोडी हत्या प्रकरणी, फरार आरोपींची स्कॉर्पिओ कार पोलिसांच्या ताब्यात
अशोक धोडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 16 दिवसानंतर फरार आरोपींची स्कॉर्पिओ कार पोलिसांच्या ताब्यात. अधिक जाणून घ्या.
अशोक धोडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना नेते अशोक धोडी हत्या प्रकरणातील कार सापडली आहे. 16 दिवसानंतर फरार आरोपींची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी,
फरार आरोपींनी राजस्थानकडे पळून जाण्यात वापरलेली स्कार्पिओ गाडी पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मध्यरात्रीच्या सुमारास राजस्थानच्या पाली येथून पालघर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अशोक धोडी यांच्या हत्येनंतर फरार आरोपींनी राजस्थान कडे जाण्यासाठी स्कार्पिओ गाडीचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे.