Crime
Jalgaon Crime News : जळगावात प्रेम विवाह केल्याच्या रागातून हल्ला; मामाकडून भाचीवर शस्त्राने वार
जळगावात प्रेम विवाह केल्याच्या रागातून मामाकडून भाचीवर शस्त्राने हल्ला. गावकऱ्यांनी मामाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
जळगाव जिल्ह्यात प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्या मामांनी भाचीवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना यावल तालुक्यातल्या पिंप्री या गावात ही घडली आहे.
दरम्यान घटनेत आरोपी मामाने भाचीच्या नणंदेवरही हल्ला करत तिला देखील जखमी केले. तसेच ग्रामस्थांनी मात्र नणंद भावजयी या दोघींचीही मामाच्या तावडीतून सुटका करत मामाला चांगला चोप दिला आणि आरोपी मामाला पोलिसांच्या स्वाधीन केले. उमाकांत कोळी असे हल्ला करणाऱ्या मामाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केले आहे.