Cyber Crime Alert
Cyber Crime Alert

Crime News: प्रेमात फसणार नाहीस? ‘I Love You’ मेसेजमागे आहेत ऑनलाइन फसवणुकीचे धोकादायक स्कॅम्स

Cyber Crime Alert: व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमाच्या नावाखाली सुरू असलेल्या ऑनलाइन स्कॅम्समध्ये ‘I Love You’ मेसेजेस वापरून लोकांची बँक माहिती आणि वैयक्तिक डेटा चोरला जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाल्यामुळे जोडप्यांमध्ये गिफ्ट्स, सरप्राईज आणि रोमँटिक प्लॅनिंगचा उत्साह आहे. अनेकजण प्रेमाच्या शोधात असताना सायबर गुन्हेगार या भावनांचा फायदा घेत आहेत. खोटे प्रेमाचे संदेश पाठवून सामान्य लोकांना जाळ्यात पकडत पैसे लुटण्याचे धंदे सक्रिय झाले आहेत.

या वेळी सरप्राईज गिफ्ट्स स्कॅम सर्वाधिक सामान्य आहे. व्हॉट्सअॅप, एसएमएस किंवा ईमेलद्वारे 'तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आले आहे' असा मेसेज येतो आणि लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. या लिंकवर पर्सनल डिटेल्स, अॅड्रेस आणि बँक माहिती भरण्यास भाग पाडले जाते. थर्ड पार्टी फेक वेबसाइटवर ही माहिती चोरली जाते आणि बँक खाते रिकामे होते.

दुसरीकडे गिव्हअवे स्कॅममध्ये सोशल मीडियावर फेक पोस्ट व्हायरल होतात. रोमँटिक डिनर, होलिडे किंवा महागडे गिफ्ट फ्री मिळेल असा दावा करून फॉर्म भरायला लावले जाते. प्रोसेसिंग फी म्हणून पैसे घेतल्यानंतर बक्षीस मिळत नाही आणि फसवणूक होते. स्कॅमर्स बँक खात्यात सेंध लावण्यासाठी हा डेट वापरतात.

डेट स्कॅम्सही वाढत आहेत. डेटिंग अॅप्स किंवा सोशल मीडियावर वेगाने विश्वास संपादन करणारे खोटे प्रोफाइल तयार करतात. 'आय लव्ह यू' म्हणून जवळ येतात आणि डेटसाठी पैसे किंवा इमर्जन्सीमुळे मदत मागतात. पैसे मिळताच गायब होतात आणि शिकार बनलेल्या व्यक्तींचे नुकसान होते.

सायबर तज्ज्ञ सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. अज्ञात लिंक्स टाळा, ओटीपी शेअर करू नका आणि संशयास्पद मेसेजेस ब्लॉक करा. व्हॅलेंटाईन डेप्रमाणे प्रेम सायबर गुन्ह्यांपासून सावध राहूनच साजरा करा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com