bihar crime news
bihar crime news

Crime News: धक्कादायक! मुलांच्या भांडणाचा घेतला सूड; मारहाणीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bihar Update: बेगूसरायमध्ये मुलांच्या किरकोळ भांडणातून निर्माण झालेल्या वैमनस्यामुळे २५ वर्षीय रणवीर कुमार याची काठ्या आणि रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

बिहारमधील बेगुसराय येथील बलिया पोलिस स्टेशन परिसरातील नूरजमापूर वॉर्ड ६ मध्ये मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत एका तरुणाचा खून झाला आहे. या घटनामध्ये आरोपींनी काठ्या आणि रॉडने मारहाण केली. या खळबळजनक घटनेचा उलगडा बुधवारी झाला. तात्काळच प्रशिक्षणार्थी आयपीएस आणि डीएसपी साक्षी कुमारी, तसेच स्टेशन प्रमुख विकास कुमार राय यांनी पोलिस दलासह घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी बेगुसराय येथे पाठवला.

मृताच्या कुटुंबीयांशी चौकशी देखील करण्यात आली असून मृतकाचे नाव रणवीर कुमार (२५) असून तो नूरजमापूर गावाचा नाथो यादव यांचा मुलगा आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे, रणवीर आणि शेजारी नरेश यादव यांच्या मुलांमध्ये वाद झाला होता. जो हळूहळू भांडणात बदलला. मृतकांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की नरेश यादव आणि त्याच्या कुटुंबीयांनी रणवीरची बेदम मारहाण करून त्याचा खून केला.

bihar crime news
Crime News: ₹80 वरून वाद… पतीने घेतला पत्नीचा जीव! कोर्टाचा कठोर निर्णय

घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीसांनी एफएसएल टीमही नियुक्त केली आहे. रणवीर कुमारचा विवाह 2021 मध्ये मधेपुरा येथील शिवकुमार यादव यांच्या मुलगी आरती कुमारीशी झाला होता. त्यांच्या दोन वर्षांची मुलगी लक्ष्मी कुमारी आहे. रणवीर दोन भावांपैकी मोठा असून, स्थानिक बाजारात अंगमेहनतीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. या खळबळजनक घटनेनंतर मृतकाच्या पालक आणि पत्नी अत्यंत दुःखात आहेत.

bihar crime news
Delhi Crime: दिल्लीमध्ये ३६ वर्षीय महिलेची क्रुर हत्या; नवराच निघाला आरोपी

स्टेशन हाऊस ऑफिसर विकास कुमार राय यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी पोलिसांना घटनास्थळी घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आणि तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगारांना पकडण्यासाठी सध्या छापेमारी सुरू आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत आणि दोषींना योग्य ती कारवाई केली जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com