Bihar Crime
Bihar Teen Murder: Chandrakant Kumar Strangled With Saree, Mobile Data Deleted | Crime News

Crime News: प्रेमप्रकरणावरून साडीने विद्यार्थ्याची गळा दाबून हत्या, डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रकार

Bihar Crime: बिहारच्या समस्तीपूरमध्ये १७ वर्षीय चंद्रकांत कुमारची साडीने गळा दाबून हत्या करण्यात आली. मोबाईलवरील चार दिवसांचे कॉल डिटेल्स मिटवण्यात आल्या.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील कर्पूरीग्राम पोलिस स्टेशन हद्दीतील चाखाजी गावात १७ वर्षीय इंटरमिजिएट विद्यार्थी चंद्रकांत कुमारची साडीने गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रकांत हा गावातीलच रहिवासी देवकांत कुमारचा मुलगा होता. मंगळवारी रात्री बेपत्ता झालेल्या या किशोराचा मृतदेह बुधवारी सकाळी घरापासून थोड्या अंतरावर सापडला, ज्यामुळे गावात हादरवून टाकणारी खळबळ उडाली.

घटनास्थळी चंद्रकांतचा मृतदेह बसलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या गळ्यात साडीचा फास बांधलेला होता आणि मानेवर खोल जखमा होत्या, ज्यामुळे गळा दाबून हत्या केल्याचा स्पष्ट संशय आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चंद्रकांत घराबाहेर पडला. बराच वेळ झाल्यानंतरही तो परतलाच नाही, म्हणून कुटुंबाने शोध घेतला, पण कोणताही पत्ता लागला नाही. बुधवारी सकाळी गावकऱ्यांना घराजवळील शौचालयाजवळ त्याचा मृतदेह सापडला. माहिती मिळताच कर्पूरीग्राम पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवला.

या प्रकरणाचा तपास करणारे सदर एसडीपीओ-१ संजय कुमार पांडे यांनी सांगितले की, तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. मृताच्या मोबाईल फोनवरील गेल्या चार दिवसांचे सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल डिटेल्स पूर्णपणे डिलीट करण्यात आले आहेत. पोलिसांना संशय आहे की, ओळखीच्या व्यक्तीने त्याला फोन किंवा मेसेज करून लॉच केले आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी डेटा पुसला. हा डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

हत्येमागे प्रेमप्रकरणाचा संबंध असण्याची शक्यता तपासली जात असली तरी, मृताचे काका संजय कुमार यांनी सांगितले की, चंद्रकांत बहुतेक वेळ घरीच राहत होता आणि त्याचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. तरीही पोलिस सर्व पैलूंचा छानचार घेत असून, घटनेचा नेमका उलगडा होईपर्यंत तपास सुरूच राहील, असे एसडीपीओ संजय कुमार पांडे यांनी स्पष्ट केले. या क्रूर हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com