Disha Salian : दिशा सालियान प्रकरणात नवीन अपडेट, वडिलांचं अफेअर आणि आर्थिक ताणावाचा उल्लेख

दिशा सालियन प्रकरणात नवीन अपडेट, वडिलांच्या अफेअर आणि आर्थिक ताणावामुळे आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद.
Published by :
Prachi Nate

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल समोर आला आहे. मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्या केल्याचं नमूद केलं आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत असल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती असाही उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये आहे.

दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं. त्यामुळे तणावातून तिने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर संभ्रम निर्माण करण्यासाठी या गोष्टी समोर आणल्या जात असल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com