Crime News : आधी मेसेज; मराठी दिग्दर्शकाने उचललं टोकाचं पाऊल
प्रसिद्ध मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक Director आशिष उबाळे Ashish Ubale (60) यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूर Nagpur येथील रामकृष्ण मठातील गेस्ट रूममध्ये त्यांनी आपले जीवन संपवले. आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिस तपासानुसार, आशिष उबाळे यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःलाच व्हॉट्सॲपवर Whatapp एक मेसेज पाठवला होता, ज्यात त्यांनी कर्जाच्या ओझ्यामुळे आयुष्य संपवत असल्याचे नमूद केले होते. उबाळे हे त्यांच्या लहान भावाला भेटण्यासाठी मठात आले होते. त्यांचा भाऊ सारंग उबाळे मठात सेवेकरी म्हणून कार्यरत आहे. जेवणानंतर विश्रांतीसाठी खोलीत गेलेल्या आशिष उबाळे यांना सायंकाळी उठवण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आशिष उबाळे यांनी अग्नी, एका श्वासाचे अंतर, किमयागार या मालिकांमध्ये लेखन आणि दिग्दर्शन केले होते. तसेच गार्गी, प्रेमासाठी वाटेल ते, बाबुरावला पकडा यांसारख्या चित्रपटांचाही त्यांनी सृजन केला होता. विशेष म्हणजे, 'गार्गी'Gargi हा त्यांचा चित्रपट 2009 साली नागपूर येथे आयोजित कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. सध्या पोलिस अधिक तपास करत असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.