UP Crime : धक्कादायक! बोगस डॉक्टरकडून हजारो शस्त्रक्रिया, गुन्हा दाखल

अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी प्रक्रिया केल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
Published by :
Shamal Sawant

दामोहच्या ख्रिश्चन मिशन रुग्णालयात ब्रिटिश हृदयरोगतज्ज्ञ असल्याचे भासवून बनावट हृदय शस्त्रक्रिया केल्याचा आरोप डॉ. एन. जॉन केमची ओळख पटवणाऱ्या यादवला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील एका फ्लॅटमधून शोधून ताब्यात घेण्यात आले. यादवने बनावट वैद्यकीय पदवी वापरून रुग्णालयात बनावट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी प्रक्रिया केल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे अटक केलेला बनावट हृदयरोगतज्ज्ञ नरेंद्र यादव ऊर्फ नरेंद्र जॉन कॅम याने 2020 ते 2024 या कालावधीत नोकरीसाठी तीन वेळा बायोडेटा पाठविला होता. त्यामध्ये त्याने हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला, अशी माहिती मध्य प्रदेशमधील नोकरी देणाऱ्या एका सल्लागार संस्थेच्या संचालकाने सांगितले. मध्य प्रदेशातील दमोह येथील मिशनरी रुग्णालयात सात रुग्णांच्या मृत्यूनंतर नरेंद्र यादवची फसवणूक व अन्य गंभीर आरोपांवरून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत 18,740 रुग्णांवर कोरोनरी अँजिओग्राफी आणि 14,236 रुग्णांवर कोरोनरी अँजिओप्लास्टी केली आहे असा दावा नरेंद्रने केला होता, दमोह जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. एम. के. जैन यांनी केलेल्या तक्रारीवरून नरेंद्रवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com