Satara: फलटणमध्ये महिला डॉक्टरने हातावर सुसाइट नोट लिहत जीवन संपवले

Satara: फलटणमध्ये महिला डॉक्टरने हातावर सुसाइट नोट लिहत जीवन संपवले

साताऱ्यातील फलटण येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

साताऱ्यातील फलटण येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. डॉ. संपदा मुंडे असं त्या महिला डॉक्टरच नाव असून काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. ”माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. अखेर काल रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, "PSI गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला".

या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलिस प्रशासनात शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याचा धक्कादायक व्हिडिओ फक्त लोकशाही मराठीच्या हाती आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com