धक्कादायक ! माजी मंत्र्यांच्या 28 वर्षांच्या मुलीने संपवलं आयुष्य, एकच खळबळ

धक्कादायक ! माजी मंत्र्यांच्या 28 वर्षांच्या मुलीने संपवलं आयुष्य, एकच खळबळ

सुरुवातीला हा अपघात असावा असं सगळ्यांना वाटलं.
Published by :
Shamal Sawant
Published on

देशाच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एका माजी मंत्र्यांच्या 28 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

आसामचे माजी गृहमंत्री, तसेच आसाम आंदोलनाचे प्रमुख नेते भृगु कुमार फुकन यांची मुलगी उपासा फुकनने आयुष्य संपवले आहे. रविवारी सकाळी गुवाहटी घारगुल्ली परिसरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्या. सुरुवातीला हा अपघात असावा असं सगळ्यांना वाटलं. मात्र ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मंत्र्यांच्या मुलीनेच आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

या सगळ्या प्रकरणाची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. त्याचप्रमाणे आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. उपासा फुकन ही माजी दिवंगत गृहमंत्री भृगू कुमार फुकन यांची एकुलती एक मुलगी होती. भृगू कुमार यांच्या मृत्यूनंतर ती आपल्या आईसह गुवाहाटीच्या घारगुल्ली परिसरातील घरात राहत होती. रविवारी अचानक तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com