Gadchiroli Crime
Gadchiroli CrimeGadchiroli Crime

Gadchiroli Crime : गडचिरोलीची धक्कादायक घटना! 6 किमी पायपीटी, गरोदर महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव मात्र अस्वस्थ करणारे आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला या दुर्गम गावात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तब्बल सहा किलोमीटर चालावे लागले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव मात्र अस्वस्थ करणारे आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला या दुर्गम गावात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तब्बल सहा किलोमीटर चालावे लागले. या त्रासातून गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आणि दुर्दैवाने आधी पोटातील बाळ, त्यानंतर मातेचाही मृत्यू झाला.

आशा संतोष किरंगा या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. नववर्षाच्या दिवशी त्या पतीसोबत जंगलातून चालत उपचारासाठी निघाल्या. प्रकृती खालावल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारांदरम्यान आई-बाळ दोघांनाही वाचवता आले नाही.

घटनेनंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत चौकशी केली. नियमित तपासणी सुरू होती, मात्र अंधश्रद्धा आणि चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती बिघडल्याचा दावा करण्यात आला. मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी मृतदेहांची हेलपाटे सुरूच राहिली, कारण जवळच्या रुग्णालयात तज्ज्ञ उपलब्ध नव्हते. जिवंतपणी रस्त्याअभावी पायपीट आणि मृत्यूनंतरही व्यवस्थेची उदासीनता—या घटनेने विकासाच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

थोडक्यात

  1. महाराष्ट्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव अस्वस्थ करणारे

  2. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोळा या दुर्गम गावात रस्त्याअभावी प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला 6 किलोमीटर चालावे लागले

  3. या सहाव्या किलोमीटरच्या पायपीटीमुळे गंभीर गुंतागुंत निर्माण झाली

  4. दुर्दैवाने सर्वप्रथम पोटातील बाळाचे, नंतर माताचे मृत्यू झाले

  5. घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित

  6. या प्रकरणातून गडचिरोलीतील रस्त्यांची आणि आरोग्य सुविधा स्थितीची गंभीर छाया दिसते

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com