Nashik Crime : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. अधिक तपास सुरू.
Published by :
Team Lokshahi

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या ओझर परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. मुलगी घरात एकटी असल्याचं बघून नराधमानी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नाशिकच्या ओझर पोलिस ठाण्यामध्ये आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com